गणेशोत्सवातून नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव

देवेंद्र देव : वाईत सुंदर गणेशोत्सव सजावट स्पर्धा बक्षिस वितरण

वाई – प्रत्येकामध्ये उपजत कलागुण असतात, गणेशोत्सवातील जीवंत सजावटीतून नावोदित कलावंतांना आपल्या अंगची कला दखविण्याचा वाव मिळतो, यामळे नवीन कलावंताचा उदय होत असतो. त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे काम वाई रोटरी करीत आहे. असे गौरवोद्गार अभिनेते देवेंद्र देव यांनी काढले.
वाई रोटरी क्‍लब आयोजित सुंदर गाणोशोत्सव स्पर्धा, बक्षिसे रोटरी सामाजिक व क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ कोमल न्यु लाईफ फाऊडेशनच्या कोमल पवार – गोडसे, लागिर झाल जी या मालिकेतील अभिनेते देवेंद्र देव व दया एकसंबोकर, पोलिस उपअधिक्षक अजित टिके, धीरज गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला. यावेळी देव बोलत होते.

-Ads-

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण, डॉ. शरद अभ्यकंर, अरूण खरे, मधुसदन नेने, नेताजी सुभाष डांगे यांना सामजिक तसेच राजकीय स्तरावरील विशाखा साळुंखे, अदित्य क्रीडापटु पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोमल गोडसे म्हणाल्या, महाराष्ट्रात अवयव प्रत्यारोपणासाठी सोयी-सुविधा आहेत. परंतु, अवयव उपलब्ध होत नाहीत, त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून समाजाचे प्रबोधन करण्यासाठी अवयव दान ही एक चळवळ पुढे नेहली पाहिजे. यावेळी धीरज गोडसे, दया ऐकसंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

रोटरी अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी कल्बच्या उपक्रमांची माहिती दिली. सुनिल शिंदे यांनी स्वागत केले. स्वाती हेळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प डॉ. नितिन कदम यांनी सुंदर सजावट स्पर्धेतील विजेत्या मंडळाची माहिती दिली. डॉ. प्रेरणा ढोबळे व डॉ. शतनु अभ्यंकर यांनी परिचय करून दिला. डॉ. सुनिल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव अजित क्षीरसागर यांनी आभार मानले.

सजावट स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे : यंग रविवार गणेशोत्सव मंडळ अवयव दान ऐतिहासिक- बालगोपाळ गणेशमंडळ (किसनवीर चौक), नवप्रकाश गणेश मंडळ, भगवा कटटा (शिवा काशिद), अजिंक्‍य गणेश मंडळ (शिवाकाशिद), भोईराज गणेशमंडळ (बहिर्जी नाईक), सुवर्ण तरूण गणेश मंडळ (शिवरांयांचे पहिले न्यायासन), सामाजिक सजावट – अजित गणोशोत्सव मंडळ (शिवरायांचे पहिले न्यायासन), सामाजिक सजावट- अजित गणोशोत्सव मंडळ (संत वाहते कृष्णामाई), बाल शिवाजी गणोशोत्सव मंडळ (कथा आमची व्यथा तुमची), ओम साई गणेशमंडळ (शेतकरी आत्महत्या) स्थिर सजावट- रणमर्द मराठा मंडळ (संगीत कारंजे), मानाचा गणपती मंडळ (शिवथरघळ), मधली आळी गणोशोत्सव मंडळ अतुल मोडक, अनुकुल सुर्यवंशी, अजिंक्‍य माहामुनी, इंरान मुजावर, जितेंद्र भोसले यांना अभिनयाची पारितोषिके मिळाली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)