गणेशोत्सवातील मुहूर्त

सर्व भक्तांचे श्रध्दास्थान असणाऱ्या गणपती बाप्पाचे दोन दिवसात आगमन होत आहे.घरोघरी विराजमान होणाऱ्या गणरायाच्या विधीवत पुजेला खूप महत्व आहे.त्यामुळे गणरायाचे आगमन जरी गुरुवारी गणेश चतुर्थीला होत असले तरी त्यांची घरात प्राणप्रतिष्ठापना मुहूर्तावर करणे याला सुद्धा महत्व अधिक आहे.

आपण प्रत्येक गोष्ट जर मुहूर्तावर करत असतो तर लाडक्‍या बाप्पाची प्रतिष्ठापना सुद्धा मुहूर्तावर झाली पाहिजे. गणेश चतुर्थीला गुरुवारी पहाटेपासून दुपारी दोन वाजून 45 मिनिटांपर्यत गणरायाची प्रतिष्ठापना करावी. अशी माहिती पंडित तेजस सप्तर्षी यांनी दिली.

ते म्हणाले, पारंपारिक पद्धतीनुसार घरातील गणरायची मुर्ती ही शाडूच्या मातीपासून तयार केलेली असावी.अशा मुर्ती मध्येच प्राणप्रतिष्ठापना करतात.त्यादिवशी गणरायाला वाहण्यासाठी 21 प्रकारच्या वनस्पती आणाव्यात त्याचबरोबर पंचखाद्य व मोदकाचा नैवेद्य दाखवावा. गणरायाला मोदक प्रिय असतात.

गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करताना सर्वप्रथम पाटावर सुती वस्त्र टाकावे त्यानंतर अक्षता ठेवून त्यावर गणेश मुर्ती स्थापित करावी.त्यानंतर हळद-कुंक वाहून पुन्हा अक्षदा अर्पण कराव्यात,केवड्याचे व कमळाचे पुष्प अर्पण करावे.गणेशाच्या गळ्यात कठीमाळ घालण्यात यावी.त्यानंतर धुप दिप आणि नैवेद्य अर्पण करावा.हे सर्व करत असताना गणगणपतयेन महा: असा उच्चार सतत करत राहावा म्हणजे अशा प्रकारे सोप्या पद्धतीने सुद्धा घराच्या घरी आपल्या पुजा करता येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
2 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)