गणेशोत्सवनिमित्त शांतता समितीची बैठक ; गुन्हे मागे घतले जातात या गैरसमजुतीत राहू नका

दौंड येथे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांचे युवकांना आवाहन

दौंड: गुन्हे दाखल झाले तरी कालांतराने ते मागे घेतले जातात, या गैरसमजुतीत कोणी राहू नये, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र कोरेच राहील याची काळजी घ्या, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी युवकांना केले.
दौंडच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात झालेल्या गणेशोत्सव व मोहरमनिमित्त पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा शितल कटारिया, तहसीलदार बालाजी सोमवंशी, अपर पोलिस अधीक्षक संदीप पखाले, उपअधीक्षक गणेश मोरे, दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, यवतचे निरीक्षक सुरज बंडगर यांच्यासह नगरपालिका व ग्रामपंचायत सदस्य, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अधिक्षक पाटील म्हणाले की, नोकरी, उद्योग, व्यवसाय करताना किंवा कुठल्याही क्षेत्रात गेलो तरी पोलिसांकडील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पाहिले जाते. ज्या तरूणांची नावे पोलिस दप्तरात नोंदली गेली आहेत त्यांना या प्रमाणपत्रामुळे नोकरी मिळालेली नाहीय. राजकारण्यांनाही कोणताही पुरस्कार किंवा शासनाच्या समित्या व महामंडळे देताना हे प्रमाणपत्र पाहिले जाते. पूर्वी सण, उत्सव व समारंभात बॅन्ड वाजविला जात होता. परंतु, डीजे व डॉल्बी आल्यापासून एका बॅन्ड पथकातील 40 जण बेरोजगार होण्यासह त्यांच्यावर अवलंबून असणारे सर्वच जण अडचणीत आले आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पखाले, तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी केले तर पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी आभार मानले तर सुत्रसंचलन दिनेश पवार यांनी केले.

पोलीस दफ्तरी नाव येवू देवू नका…

सण-उत्सवांच्या दरम्यान व इतर वेळी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये अनेक वेळा फक्त नेत्यांची नावे मागे घेतली जातात. परंतु, कार्यकर्त्यांची नावे पोलिस दप्तरी कायम राहतात. तेव्हा कार्यकर्त्यांनी व विशेष करून तरूणांनी नेहमी कायद्याचे पालन करीत पोलिस दप्तरी नाव येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)