गणेशवाडीत दिंडीकरांना आमटी-भाकरी प्रसाद

नीरा नरसिंहपूर-माउलींच्या संजिवन समाधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंढरपूरहून दिंडीचे प्रस्थान झाले आहे पंढरपूरच्या देहुकर फडाच्या दिंडीचा गणेशवाडीत परंपरेप्रमाणे नुकताच मुक्काम झाला. त्यावेळी दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना ग्रामस्थांच्यावतीने आमटी-भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर फडाचे प्रमुख बापुसाहेब देहुकर महाराज (पंढरपूर) यांच्या उपस्थितीत कान्होबा महाराज यांचे किर्तन झाले. ग्रामस्थांच्या वर्गणीतून ज्वारी, बाजरीच्या भाकरी तसेच तुरडाळीची आमटी करण्यात येते. दिंडीतील भाविकांना तसेच ग्रामस्थांनाही प्रसादाचे वाटप करण्यात येते. तुकाराम महाराजांचे वंशज सोपानकाका देहुकर महाराजांची दिंडीत कान्होबा महाराज यांचे किर्तन सायंकाळी झाले. दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांच्यावतीने दिंडीला निरोप देण्यात आला. त्यानंतर शिंदेवस्ती येथे चहा व नाष्टा करण्यात आले. त्यानंतर पिंपरी बुद्रुकमध्ये दुपारच्या विसाव्या प्रसंगी शरद बोडके यांच्यावतीने बुंदीचे लाडू, चिवडा, चहा व पाण्याचे वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)