गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची कुंभारवाड्यात लगबग

फलटण, दि. 10 (प्रतिनिधी) – गणेश प्रतिष्ठापना दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने कुंभार समाजाची गणेशमूर्तीवर हात फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे. गणेशमूर्तीची सुबकता व देखणेपणा जपण्यात यशस्वी झालेल्या तांबवे, ता. फलटण येथील गणेश कुंभार यांच्या गणेशमूर्ती वाई, सातारा, पाचगणी, वेळापूर, बारामती, भोर, कराड, दहिवडी, अकलूज, खंडाळा, नीरा, लोणंद व परिसरात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जात आहेत.
तांबवे येथील गणेश कुंभार यांचे शिक्षण जीडी आर्ट झालेले असून त्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या गावातच करण्याचे ठरवले. पत्नीला बरोबर घेऊन गणपती, गौरी बनविण्याचा छोटा व्यवसाय उजाड माळरानावर सातारा- लोणंद रस्त्याच्या उजव्या बाजूस 2010 साली सुरु केला. कुंभार बांधवाची व्यवसायातील ख्याती सातारा जिल्ह्याला आहे. त्यामुळेच आतापासुनच अगदी घरगुती गणेशमुर्तीपासुन मंडळाच्या मोठ्या आकर्षक मूर्ती खरेदीसाठी तांबवेकर यांच्याकडे मंडळाच्या कार्यकर्त्योची वर्दळ वाढू लागली आहे. यावर्षी रंगाचे व प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे भाव वाढले आहेत. तसेच जीएसटीमुळे दरात काही प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याचे कुंभार कुटुंबीय यांनी सांगितले. अडीचशे रुपयापासुन ते सत्तर हजार रुपयापर्यंत मुर्तीच्या किमती असल्याचे, व जास्तीत जास्त चौदा फुटापर्यंतची गणेशमुर्ती बनवित असल्याचे ते म्हणाले. गेली वर्षभर येथे गणेश मुर्ती बनविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. विष्णु कुभार, विनायक कुंभार, अर्जुन कुंभार, गोरख कुंभार आदी कलाकार रात्रंदिवस येथे कामात गुंतल्याचे दिसत आहे. उद्यापासुन कारखान्यातील सर्व मुर्ती विक्रीसाठी सज्य असल्याची माहिती गणेश कुभार यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)