गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात

नवी दिल्ली: महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात आज पासून गणेशमूर्ती आणि पूजेच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासह अनेक मान्यवरांनी पहिल्याच दिवशी गणेशमूर्ती राखीव करून ठेवल्या आहेत. गणेशमूर्तींची विक्री  13 सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला वाव मिळावा व त्यांच्या मूर्तींना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, दिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमूर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळातर्फे गेल्या 26 वर्षांपासून गणेशमूर्ती व पूजेच्या साहित्याची विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात 39 गणेश मंडळांत गणेशोत्सव साजरा होतो. त्यासोबतच अमराठी भक्तांचाही गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे.

याठिकाणी  गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य खरेदीसाठी लोकांची लगबग दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, नवी दिल्ली महानगर पालिकेचे अध्यक्ष नरेश कुमार यांनी  तसेच  दिल्लीस्थित त्रिभुवनदास जव्हेरी,नंदा एस्कोर्ट व सरीन कंपनी आदिंसह  काही गणेश मंडळांनी मोठ्या गणरायाच्या मूर्ती राखीव करून ठेवल्या आहेत.

ठाणे येथील मंदार सूर्यकांत शिंदे हे मागील 20 वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रीकरिता दिल्लीतील ‘मऱ्हाटी’एम्पोरियमध्ये येतात. यंदा लहान मोठ्या आकाराच्या एकूण 1400 गणेशमूर्ती येथे आहेत. यात 1200 मूर्ती इकोफ्रेंडली आहेत तर उर्वरित 200 मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आहेत. 6 इंच ते 7 फुटापर्यंतच्या गणरायाच्या मूर्ती येथे उपलब्ध आहेत. 700 रूपयांपासून ते 60 हजार रूपयांपर्यंत गणेशमूर्तींची किंमत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)