गणेशमुर्त्यां बनविण्यासाठी कारागिरांची लगभग

मंचर- गणेश उत्सवजवळ आल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कारागीर मूर्ती बनविण्यात मग्न आहेत. सध्या मुर्त्यांवर रंगकाम करण्याचे काम वेगात सुरू आहे. गणेशोत्सवात आकर्षक गणेश मुर्तींना मोठ्‌या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे अनेक कारागीर आकर्षक मूर्ती बनवत असून त्याचे रंगकाम अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येत आहे.
13 ऑगस्ट रोजी गणपती उत्सवाला सुरुवात होते. महाराष्ट्राचा सांस्कृतिक सण म्हणून याकडे पाहिले जाते. अगदी अर्ध्या फुटापासून ते पन्नास फुटांपर्यंतच्या मुर्त्यां उत्सवात पहावयास मिळतात. पूर्वी ठराविक ठिकाणी गणेशमुर्त्यां बनविल्या जात असत. आता याकडे रोजगाराचे साधन म्हणून पाहिले जात असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मूूर्त्यां बनविल्या जात आहेत. सध्या या कामांना वेग आला असून रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. दहा दिवसांच्या उत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे उत्सवाला वेगळेच महत्व आहे. वेगवेगळ्या आकारांच्या वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेल्या गणेशमुर्त्यां विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)