गणेशनगर परिसरात विद्यार्थ्यांची शोभायात्रा

वाकड – शिवजयंतीनिमित्त थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलाच्या वतीने बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गणेशनगर परिसरात शोभायात्रा काढण्यात आली.

शहाजीराजे भोसले यांच्यापासून ते शाहू महाराजांपर्यंतचे शिवकुटुंबातील सदस्यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी तसेच लेझीम पथक यात सहभागी झाले होते. इयत्ता सहावीची विद्यार्थिनी संचिता काशिंदे हिने पुण्य पवित्रभूमीचा, आहे निखारा क्रांतीचा हे गीत गायले. अर्णव जगदाळे व अक्षदा मंडलिक या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा पाळणा गायला, तसेच इयत्ता नववीची अंजली कांबळे हिने आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त ही कविता सादर केली. इयत्ता चौथीचा सार्थक वाल्हेकर याने महाराजांची किर्ती सांगणारा पोवाडा गाऊन सर्व श्रोत्यांच्या मनात शिवचैतन्य जागृत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गीतकार अशोक नाना गायकवाड व किरण गायकवाड यांनी आम्ही शिवाचे शूर शिपाई, भवानी आमची आई हे शिवरायांच्या जीवनावरील गीत गाऊन सर्व श्रोत्यांची मने जिंकली. लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाच्या विभाग प्रमुख अश्विनी बाविस्कर यांनी कायद्यानेच व शिस्तीनेच राज्य चालते, किल्लेदाराने खुद्द राजालाच नियम कसा दाखवून दिला हे सांगणारी गोष्ट सांगून शिवरायांच्या गुणांचे वर्णन केले. सूत्रसंचालन सुधाकर हांडे, प्रास्ताविक मंजुषा गोडस यांनी केले. मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी आभार मानले. बालवाडीच्या विभाग प्रमुख आशा हुले, पुष्पा जाधव, दिपाली नाईक, वनिता बकरे, सीमा आखाडे, छाया सुरवसे, संदीप बरकडे, अंजली सुमंत, वनिता जोरी, सुनिता घोडे यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)