गणेशउत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखा : नारायण गीते

सातारा,दि.8(प्रतिनिधी)
गणेश उत्सव काळात सामाजीक भान राखा. कोणतेही चुकीचे काम करू नका. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी पोलिस दल ठामपणे उभे राहील. त्यामुळे उत्सवकाळात ककायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. याची काळजी घ्या असे अवाहन सातारा तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नारायण गिते यांनी केले.
डॉल्बी ऐवजी पारंपारिक वाद्यांचा गणेशोत्सव काळात वापर करा. तसेच मंडळाला गणपती बसवण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे. ग्रामस्थांकडून बळजबरीने वर्गणी गोळा करू नका. गणपती विसर्जन मिरवणुका शांतेत काढण्याचे आवाहन त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले.
कण्हेर ता. सातारा येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सातारा तालुका पोलिसांच्या वतीने गणेश उत्सव आढावा बैठकीमध्ये गीते बोलत होते. यावेळी नेहरू युवा, भगवे वादळ तालीम संघातील गणेश भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी आवश्‍यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. अनेक वर्षापासून येथील मंडळाने राबवलेला एक गाव एक गणपती उत्सव कार्यक्रम स्तुत्य आहे. समाजसेवेसाठी पोलीस यंत्रणा नेहमीच सज्ज असून आवश्‍यक तेथे सहकारी ही करेल. असे हेड कॉन्स्टेबल राजू मुलानी म्हणाल.
यावेळी तालुका पोलिसांचे स्वागत गणेश मंडळाच्यावतीने करण्यात आले. दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कण्हेरसह साबळेवाडी, चिंचणी, गोगावलेवाडी ,जांभळेवाडी व नुने आदी गावांत बैठका घेण्यात आल्या.
यावेळी परिसरातील विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)