गणपीर बाबा उरुसानिमित्त रंगला कुस्तीचा आखाडा

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील आंबी-खालसा येथे सालाबादप्रमाणे यंदाही हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत अब्बास शाहा वली ऊर्फ गणपीर बाबा यांच्या उरूसानिमित्त विविध कार्यक्रमांबरोबर कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.

गणपीर दरा येथे उरुसानिमित्त गणपीर बाबा यांची मानाची चादर मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी भाविकांसाठी महाप्रसाद, रात्री लोकनाट्य, तमाशा आदी कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी दुपार नंतर समस्त ग्रामस्थ आंबी खालसा आणि मुस्लीम नवजवान कमिटी गणपीरदरा यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला. जुन्नर, नगर, सिन्नर, ओतूर, अकोले, बीड या ठिकाणांहून आलेल्या पहिलवानांनी हजेरी लावली होती. यावेळी पहिलवानांना आपले ५० रुपयांंपासून ५१०० रुपयांंपर्यंत रोख बक्षिसे देण्यात आले.

कुस्त्यांचा जंगी आखाडा चांगलाच रंगला आखाड्यातील शेवटची कुस्ती पै. गणेश चौधरी (जुन्नर) आणि पै.सुदर्शन लोखंडे (बीड) यांच्यात मा.सरपंच सर्जेराव पाटील ढमढेरे यांच्या हस्ते लावण्यात आली. या रंगतदार कुस्त्यांच्या आखाड्यात पंच म्हणून विजय भोर, पै.तानाजी मुंढे, श्रीकांत घाटकर यांनी काम पाहिले. यावेळी आंबी खालसा सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच सर्व परिसरातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांसह पानसवाडी, जोठेवाडी, माळवदवाडी, गणपीरदरा, प्रभाकरनगर येथील ग्रामस्थ व कुस्ती शौकीन उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
3 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)