गणपती सजावटीला “स्वदेशी’चा बाज

पवनानगर : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपला लाडका बाप्पाही आता तयार होऊन आपल्या घरी येण्यास सज्ज झाला आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आकर्षक सजावट करायची असते. कोणी सजावटीचे तयार सेट घेऊन त्याला रोषणाईची जोड देतो, तर कोणी वेगवेगळे साहित्य घेऊन आपली कला आजमावून पाहतो.

सध्या पवनानगर, लोणावळा, कामशेत, तळेगाव पिंपरी बाजारात सजावट साहित्याची रेलचेल दिसून येते. सजावटीतलं पहिलं काम म्हणजे मखर. या वर्षी महाराष्ट्र शासनाने थर्माकोलच्या वापरावर बंदी आणल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी कागदी पुठ्ठ्यास मखर विक्रीस ठेवले आहेत. पण अशा मखरांना अत्यल्प प्रतिसाद असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लोकांना अनेक वस्त्र थर्माकोलचे मखर वापरण्याची सवय असल्यामुळे ते अचानक पुठ्ठ्याची मखर वापरण्यास तयार होत नाहीत. वजनाला कमी, सहज हाताळणी आणि कमी खर्च यामुळे थर्माकोल आपल्याकडे अधिक लोकप्रिय झाले होते. पण त्याचा वापर केवळ मखरच नाही, तर इतर सजावटीसाठीदेखील केला आहे.

इंडियन वस्तुच्या तुलनेत चायना वस्तुच्या किंमती कमी होत्या. त्या तुलनेत भारतीय वस्तु महाग असल्याने ग्राहकांनी बाजारपेठ कानाडोळा करताना दिसत आहे. यंदा प्लास्टिक बंदीमुळे नागरीकांना थर्माकोलचे मखर मिळत नसल्याने ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)