गणपती मंडळांनी परवानगी काढावी

आळेफाटा-जमाव बंदी आदेश लागू असल्याने गणपती मंडळांनी परवानगी काढून घ्याव्यात, असे आवाहन नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे.
साळवाडी (ता. जुन्नर) परिसरातील गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गोरड शनिवारी (दि. 26) आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच पांडुरंग काळे, उपसरपंच कैलास काळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुदाम काळे, पोलीस पाटील प्रगती सोनवणे, राजेंद्र भोर, ग्रामपंचायत सदस्य व गणपती मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गोरड म्हणाले की, पाच पेक्षा अधिक लोक एकत्र जमा करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने गणेश मंडळानी संबंधित पोलीस ठाण्याची परवानगी काढणे बंधनकारक आहे. डी.जे.वरही बंदी आहे. त्यामुळे डी.जे. कोणी वाजवू नये, ध्वनी क्षेपकाच्या आवाजावर मर्यादा ठेवावी. रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी आहे. त्यामुळे रात्री 10 नंतर कार्यक्रम घेऊ नयेत, नियम मोडणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांवर कार्यवाही होऊ शकते. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहूनच मंडळानी गणेश उत्सव साजरा करावा, असे गोरड यांनी सांगितले. पांडुरंग काळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)