गणपतीची आरती केल्याने कतरैना ट्रोल

बॉलिवूडमध्ये हल्ली प्रत्येकावरच गणेशोत्सवाचा फिव्हर चढला आहे. सलमान खानच्या घरीही जर गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत असेल, तर कतरिना तरी त्यापासून दूर कशी काय राहू शकेल.

सलमानची बहिण अर्पिता शर्माच्या घरी कतरिना आरतीसाठी गेली. सलमानचा जीजा अतुल अग्निहोतीने या आरतीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आणि तिला ट्रोल करायला नेटकऱ्यांनी सुरुवात केली. कारण कतरिनाने आरतीच्यावेळी एक चूक केली होती. तिची ही चूक लोकांना दिसू नये म्हणून अतुलने हा व्हिडीओ नंतर डिलीटही केला. पण नेटकऱ्यांनी कतरिनाची चूक बरोबर ओळखली होती.

आरतीच्यावेळी कतरिना आरतीची थाळी उलटीकडून फिरवत होती. तिला आपले काय चूकते आहे, हे ध्यानातही आले नव्हते. पण लोकांना मात्र हसायला येत होते. तिच्याकडून अनवधानाने झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न तिथे उपस्थित असलेल्यांपैकी कोणीही केला नाही. या आरतीच्यावेळी सलमान खानचा सगळा परिवार उपस्थित होता. अरबाझ खान, हेलन, सोहेल खान, सल्;ईम खान अर्पिता हे सगळजण उपस्थित होते.

या सगळ्यांना ही चूक समजली की नाही, ते माहित नाही. मात्र अतुलने ही चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. त्याने हा व्हिडीओ हटवून दुसरा व्हिडीओ अपलोड केला. पण त्यामध्ये कतरिनाचा उल्लेख टाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)