गडचिरोलीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या 37

इंद्रावती नदीत सापडले आणखी 15 मृतदेह
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यामध्ये रविवारी झालेल्या चकमकीनंतर आणखी 15 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती आले. त्यामुळे त्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय, जिल्ह्यात दुसऱ्या ठिकाणी सोमवारी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी मारले गेले. त्यामुळे दोन दिवसांत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या 37 वर पोहचली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 कमांडोंनी केलेल्या कारवाईला प्रचंड यश मिळाल्याचे मानले जात आहे.
गडचिरोलीच्या कसनसूर जंगलात सी-60 कमांडोंच्या पथकाने रविवारी नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक मोहीम राबवली.

त्यादिवशी झालेल्या चकमकीनंतर 9 पुरूष आणि 7 महिला मिळून 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती आले. मुसळधार पाऊस आणि कमी मनुष्यबळामुळे पोलिसांनी त्यादिवशी शोधमोहीम थांबवली. त्यानंतर सोमवारी इंद्रावती नदीत नक्षलवाद्यांच्या मृतदेहांचा शोध घेण्यासाठी पुन्हा मोहीम होती घेतली. त्या मोहिमेवेळी आणखी 15 मृतदेह हाती आले. ही मोहीम मंगळवारीही सुरू होती.

-Ads-

दरम्यान, कमांडोंनी सोमवारी राजाराम खांडला जंगलात नक्षलवाद्यांच्या विरोधात आणखी एक मोहीम राबवली. त्यावेळी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी मारले गेले. मृत नक्षलवाद्यांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कारवाई म्हणजे देशातील मोठ्या नक्षलवादविरोधी मोहिमेपैकी एक मानली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)