गडचिरोलीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या 39

नागपूूर – गडचिरोली जिल्ह्यात रविवारी झालेल्या चकमकीनंतर आणखी 2 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती आले. त्यामुळे त्या जिल्ह्यात दोन चकमकींमध्ये मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 39 वर पोहचली आहे. गडचिरोलीच्या कसनसूर जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 कमांडो पथकाने नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक मोहीम राबवली. त्यानंतर नक्षलवाद्यांच्या मृतदेहांचा शोध घेण्यासाठी इंद्रावती नदीत मोहीम हाती घेण्यात आली.

या मोहिमेवेळी आणखी दोन नक्षलींचे मृतदेह सापडले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांपैकी 16 जणांची ओळख पटली आहे. त्यांच्यासाठी मिळून 1 कोटी रूपयांहून अधिक रकमेची बक्षीसे जाहीर करण्यात आली होती. गडचिरोलीमधील कारवाईने नक्षलवाद्यांना जबर हादरा बसला आहे. देशातील मोठ्या नक्षलवादविरोधी मोहिमांपैकी एक म्हणून या यशस्वी कारवाईकडे पाहिले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)