गडचिरोलीत चकमकीत १३ नक्षली ठार

संग्रहित छायाचित्र.

भामरागड: गडचिरोलीतील भामरागड तालुक्याच्या ताडगाव जंगल परिसरात राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी चकमकीत १३ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. पोलिसांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ अजूनही सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे.

ताडगाव जंगलात नक्षलवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. या दरम्यान नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना ठार मारले. यात कमांडर साईनाथ आणि सिनू हर या दोन नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. जंगल परिसरात अद्यापही कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचे म्हटले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)