गडकिल्ल्यांची दिवाळी

दिवाळी आली कि आपल्याकडे लहान मुलांची धावपळ सुरु होते ते खरेदी करायला, फराळ खायला, फटके विकत घ्यायला आणि गडकिल्ल्यांची प्रतिकृती बनवायला. दिवाळीतल्या या गडकिल्ल्यांच्या उपक्रमामुळे लहान मुलांना ३५० वर्षापूर्वीचा आपला गौरवशाही इतिहास अभ्यासायला मिळतो. तेव्हाच्या भौगोलिक परिस्थिती बद्दल जाणून घेताना दिसतात.

असाच उपक्रम शिवज्योत सोहळा समितीने सलग ४ थ्या वर्षी कोपरखैरणे सेक्टर १० मध्ये स्पर्धेच्या माध्यमात राबवला. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण होते ते किल्ले जमरुद… आता हो कोणता किल्ला असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. आपल्याला लहानपणा पासून शिवनेरी, तोरणा, राजगड, रायगड, पुरंदर, सिंहगड, प्रतापगड आणि पन्हाळा अश्याच काही किल्ल्यांची शाळेतल्या पाठ्यपुस्तकच्या माध्यमातून माहिती मिळालेली आणि मोठे झाल्यावर आणखी काही शंभरएक गडकिल्ले ज्ञात होतात.

स्वराज्य असा शब्द आला कि आपल्याला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व गडकिल्ले… पण याचं स्वराज्याचा विस्तार नंतर कटक ते अटक झाला होता हे आपल्याला कमी माहित आहे. तर याचं अटकेपार म्हणजे अगदी आताच्या पाकिस्तानमधल्या पेशावरच्या हद्दीवर हा किल्ला आहे. १७५७ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला रघुनाथ राव, होळकर यांनी जिंकला होता.

मुलांना महाराष्ट्राबाहेरचे किल्ल्यांची ओळख व्हावी यासाठी हा किल्ला निवडला होता. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर यांच्या इतिहास संशोधनावरून आणि काही इतिहास संशोधकाच्या अभ्यासच्या पायावर या किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात आली. हि प्रतिकृती स्पर्धेत न उतरवता प्रमुख आकर्षण म्हणून ठेवली होती. या स्पर्धेत १०-१२ गटांनी मिळून किल्ले प्रतिकृती बनवल्या. प्रत्येक गटात २ ते ४ मुलांचा सहभाग होता. सर्व मुलांनी आवडीचे गड निवडून उत्तमरित्या माहिती गोळा करून त्यांची बांधणी केली.

प्रतापगड, तोरणा, पद्मदुर्ग, खांदेरी, जंजिरा अशी मेजवानी या उपक्रमानिमित्त अनुभवायला मिळाली. छोट्या लहान मावळ्याच्या तोंडी त्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा इतिहास ऐकताना शहारे येत होते. अशीच इतिहासाची ओढ या लहानग्यांना राहण्यासाठी असे उपक्रम नक्कीच हातभार लावतात हे पुन्हा एकदा शिवज्योत सोहळा समितीने दाखवून दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
9 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)