गटारातील पैसे खाणाऱ्यांच्या तोंडी अशीच वक्तव्ये येणार

आ.शशिकांत शिंदे यांची शिवसेनेवर सडकून टीका
सातारा,दि.27 प्रतिनिधी- मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये खर्च करून देखील पावसाळ्यात मुंबई तुंबत असते. त्याचा त्रास किती सहन करावा लागतो हे संपुर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे गटारांच्या कामात देखील पैसे खाणाऱ्यांच्या तोंडी अशीच वक्तव्ये येणार, अशी टिका आ.शशिकांत शिंदे यांनी यांनी शिवसेनेवर केली.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे नेते आ.अजित पवार यांनी टिका केली होती. जे वडिलांचे स्मारक बांधू शकले नाहीत ते राम मंदिर काय उभारणार, असा बोचरा सवाल पवारांनी ठाकरेंना विचारला होता. त्यावर शिवसेनेने शनिवारी सामनाच्या माध्यमातून अजित पवारांचा उल्लेख गटारी किडा असा केला.
त्या टिकेला उत्तर देताना आ.शिंदे म्हणाले, अजित पवारांनी टिका करताना ग्रामीण शब्द वापरले होते. मात्र, शिवसेनेने ज्या प्रकारे पवारांवर टिका केली आहे. ते पाहता आणि त्यांनी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामकाजानंतर त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा ठेवता येणार नाही. त्याच बरोबर एकेकाळी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे देखील विरोधकांवर टिकेचे आसूड ओढायचे मात्र त्यांनी टिकेची पातळी मर्यादित ठेवली होती. अशी आठवण सांगून म्हणाले, अजित पवार हे आज ही बारामतीमधून लाखाच्या फरकाने निवडून येतात आणि त्यांच्या कार्यपध्दतीची शिवसेनेचे आमदार देखील कौतुक करित असतात. उध्दवजींनी एकदा त्या आमदारांशी कानगोष्टी करून माहिती घ्यावी, असे शिंदे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)