गटई कामासाठी बैठा पीच परवाना

पिंपरी – “शहरातील चर्मकार समाज बांधवांसाठी एक सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी प्रयत्न असणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात गटई काम करणाऱ्या चर्मकार समाजातील बांधवांना महापालिकेच्या माध्यमातून बैठा पीच परवाना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी दिले.

स्वाभिमानी चर्मकार महासंघ पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने संत तुकारामनगर येथील संत रोहिदास क्रीडा व सांस्कृतिक भवन येथे स्वाभिमानी चर्मकार महासंघाच्या “चर्मकार समाज जोडो अभियान’ प्रसंगी नवर्निवाचित महापौर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय महासचिव गोरख ननवरे, उपाध्यक्ष सुरेश पोटे, प्रदेश कार्याध्यक्ष जयदेव इसवे, संघटक विकास तिखे, रामचंद्र गद्रे, संत रोहिदास प्रचारक संतोष तिखे, जिल्हा उपाध्यक्ष संजय लोकापुरे, दत्तात्रय भोसले, पुणे शहराध्यक्ष विकास सोनवणे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी महापौर जाधव म्हणाले की, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत संत गुरू रोहिदास (रविदास), वीर कक्कया, पितामहा हरळय्या यांचे क्रांतीकारक विचार व त्यांनी केलेले समाज प्रबोधनपर कार्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम संघटनेच्या वतीने समाजापर्यंत पोहचल्यानंतर खऱ्या अर्थाने समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.

संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, महासंघाचे नियम व कार्य (प्रोटोकॉल), कर्ज प्रकरण, तरूणांना रोजगार, सभासद नोंदणी करणे, गटई कामगारांचे प्रलंबित प्रश्न, पुढील कार्यक्रमाचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)