गजानन महाराज प्रकटदिन सोहळा उत्साहात साजरा

अर्कशाळानगर :अनिल देशपांडे यांच्या उपस्थितीत महाआरतीत सहभागी झालेले भाविक-भक्त. (छाया ः नेहा जाधव)

गण गण गणात बोते चा जयघोष
सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) – अर्कशाळानगर येथील गजानन महाराज मंदिरात प. पू. सद्‌गुरु श्री महाराजांच्या 141 व्या प्रकटदिन उत्सवानिमित्त गुरुवार, दि. 21 ते सोमवार, दि. 25 फेब्रुवारीअखेर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आज सकाळी 7 ते 8.30 या वेळेत श्रींच्या मूर्तीवर “गण गण गणात बोते’ या सिद्धमंत्राच्या नामघोषात महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा अर्चा, आरती व नामस्मरण करण्यात आले. त्यानंतर सकाळी 9 ते 11 श्री गणेश याग, श्री दत्त याग, स्थापित देवतांची पूजा, बलिदान, पूर्णाहुती, श्रेयोदान आदी कार्यक्रम झाले. सकाळी 11 ते 11.30 श्री गजानन विजय ग्रंथातील पहिल्या अध्यायाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. दुपारी 12 वाजता महाआरती, दुपारी 12.30 ते 2.30 महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर व परिसरातील असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी 6 ते 7 माऊली भजनी मंडळ करंजे यांचा हरिपाठाचा कार्यक्रम आणि रात्री 7.30 ते 8.00 महाआरती झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)