गगनयान मोहिमेत एक महिला अंतराळवीराचा समावेश – इस्रो प्रमुख सिवान

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो लवकरच गगनयान अंतराळात सोडणार आहे. त्यासाठीची तयारी मोठ्या जोरात चालू आहे. या गगनयान मोहिमेत एका महिला अंतराळ वीराचा समावेश होण्याची शक्‍यता असल्याची माहिती इस्रो प्रमुख के सिवान यांनी दिली आहे. इस्रोसाठी एकूण 30 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी केवळ गगनयान मोहिमेसाठी 10 हजार 600 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. चालू वर्ष हे गगनयान मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सन 2020 मध्ये पहिले आणि सन 2021 मध्ये दुसरे मानवरहित अंतराळयान सोडण्यात येणार आहे. आणि डिसेंबर 2022 मध्ये मानवासह गगनयानाचे प्रक्षेपणकरण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. अंतराळ वीरांना गगनयान मोहिमेसाठीचे प्राथमिक प्रशिक्षण भारतात आंणि पुढील प्रशिक्षण रशियात देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी एका महिला अंतराळ वीराची निवड करण्याचे शक्‍यता के सिवान यांनी व्यक्त केली आहे.

सन 2022 पर्यंत भारत अंतराळात मानव पाठवील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात जाहीर केले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एका महत्त्वाकांक्षी मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. चांद्रयान (ऑक्‍टोबर 2008) आणि मंगळयान (सप्टेंबर 2014) नंतरचा गगनयान हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे.
गगनयान मोहिमेअंतर्गत एका महिला अंतराळ वीरासह तीन अंतराळवीरांना किमान सात दिवसांसाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. अंतराळात मानवासह अंतराळ यान पाठवणारा भारत हा चौथा देश बनणार आहे. या पूर्वी रशिया, अमेरिका आणि चीनने अंतराळात मानव पाठवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)