गगनयान मिशन वेळापत्रकाप्रमाणे पुर्ण करणार

नवी दिल्ली: भारताने अंतरीक्षात मानवासहीत यान पाठवण्याची योजना गगनयान मिशन अंतर्गत हाती घेतली असून ही योजना तिच्या वेळापत्रकानुसार पुर्ण करण्याचा भारतीय अंतरीक्ष संस्था म्हणजेच इस्त्रोचा इरादा आहे अशी माहिती केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी दिली. आज या विषयावर पीटीआय या संस्थेशी बोलताना ते म्हणाले की ही योजना पुर्ण नियोजनबद्धपणे आकाराला येते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमीत्त लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणात भारत सन 2022 मध्ये मानवासहित अंतरिक्षात यान पाठवणार असल्याची घोषणा केली आहे.

ते म्हणाले की आम्ही ही योजना निर्धारीत कालावधीत पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार असलो तरी त्यातही अनेक आव्हानांचा आम्हाला मुकाबला करायचा आहे. या आधी रशिया आणि अमेरिकेने अंतरिक्षात मानवासह यान पाठवले आहे त्यामुळे त्यांचाही या मोहीमेत सल्ला घेतला जाणे स्वाभाविक आहे. या मोहीमेच्या खर्चाविषयी माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की अशा मोहीमांना येणाऱ्या खर्चांबद्दल या आधीही आक्षेप घेतले गेले आहेत. त्या आक्षेपांना काहीही अर्थ नसतो. ते म्हणाले की आधी इस्त्रोकडून अवकाशात रॉकेट सोडण्याच्या प्रयत्नांनाही आक्षेप घेतले गेले होते. अशा मोहिमांवर खर्च करण्यात काय अर्थ आहे असे प्रश्‍न त्यावेळी विचारले गेले होते पण इस्त्रोचे हे प्रयत्नच आज फळाला आले आहेत असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)