गगनभरारी घेणारी पहिली भारतीय महिला अंतराळवीर…

कल्पनाचा जन्म 17मार्च 1962 ला कर्नाल, हरियाणा येथे झाला. मॅट्रिकच्या परीक्षेस पात्र ठरावी म्हणून तिची जन्मतारीख बदलून 1जुलै 1962 करण्यात आली होती. “बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात” या म्हणीला सार्थ असं कल्पनाचं बालपण होतं. एकदा शाळेत नकाशा काढायला सांगितला असताना कल्पनाने संपूर्ण नकाशा भिंतीवर काढला. नल सेट्‌स आणि एम्प्टी सेट्‌स शिकत असताना “अवकाशात गेलेल्या भारतीय महिला” हा नल सेट राहणार नाही असे विधान शिक्षकांसमोर केले. तिला लहानपणी विमानांची चित्र काढायची फार आवड होती. अवकाश भरारी घ्यायचे स्वप्न तिने लहानपणापासून उराशी बाळगलं होतं.

हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने पंजाब युनिव्हर्सिटी मधून ऐरोनॉटिकल इंजिनीयरिंगचं शिक्षण घेतलं. 1982मध्ये पुढील शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली. 1984मध्ये तिने ऐरोस्पेस इंजिनीरिंगमध्ये मास्टर्सचं शिक्षण घेतलं. 1988 मध्ये तिने कोलोरॅडो युनिव्हर्सिटी मधून याच विषयात पीएचडी मिळवली. याच सुमारास कल्पनाने नासामध्ये काम करण्यास सुरूवात केली. लॅंडिंग आणि टेक ऑफ दरम्यान कॉम्प्युटेशनल फ्लूईड डायनॅमिकस वर संशोधन केले. 1993 मध्ये ओव्हरहेड मेथडची व्हाईस प्रेसिडेंट बनली. त्यानंतर तिने फ्लाईट इन्स्ट्रक्‍टर बनली आणि लायसन्ससुद्धा मिळवलं. पुढे 1996 मध्ये कल्पनाची पहिल्या फ्लाईटसाठी निवड झाली.

19 नोव्हेंबर 1999ला कल्पनाची पहिली अवकाश मोहीम सुरू झाली. मोहिमेसाठी चाललेल्या 6 सदस्यीय संघात तिचा समावेश होता. आता कल्पना अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला तसेच राकेश शर्मा नंतर दुसरी भारतीय बनली होती. अवकाशात वेटलेसनेस अनुभवत असताना “You are just your intelligence” असे ती म्हणाली या मोहिमेत ती 352 तासापेक्षा जास्त वेळ अवकाशात होती आणि तिने 1,67,37,771 किलोमीटरचा प्रवास केला. या मोहिमेत स्पार्टन सॅटेलाईटची जवाबदारी कल्पनाकडे होती. ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर कल्पनाला विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. एका पत्रकाराने भारतीय मुळाविषयी विचारल्यावर “I am citizen of the world. I belong everywhere” असे तिचे समर्पक उत्तर होतं. 2000च्या सुमारास कल्पनाची दुसऱ्या अवकाश मोहिमेसाठी निवड झाली. ही मोहीम तांत्रिक अडचणींमुळे लांबत गेली. या मोहिमेत पृथ्वी आणि अवकाश विज्ञान या विषयांवर एकूण 80 प्रयोग केले गेले. जुलै 2002 मध्ये यानाच्या इंजिन लाईनर्सला तडा गेला. पृथ्वीवर परतत असताना तड्यामुळे यानाच्या समतोल बिघडला आणि त्याचे तुकडे झाले. या अपघातात भारताने आपला अनमोल “हिरा’ गमावला.

आज कल्पना आपल्यात नाही पण तिच्या रूपाने प्रेरणेचा अखंड स्रोत आपल्याकडे आहे. तिने आपल्याला स्वप्न पाहायला शिकवलं. नुसतंच स्वप्न पहायला शिकवलं नाही तर स्वप्न जगायला, स्वप्न पूर्ण करायला शिकवलं. आकाश भरारी घ्यायची धमक शिकवली. समाजाच्या जुन्या समजुतींना तिच्यामुळे तडा गेला. मुलीसुद्धा मुलांच्या बरोबरीने सर्व काही करू शकतात किंबहुना त्या सरस सुद्धा आहेत हे दाखवून दिलं. शिक्षण, परिस्थितीशी झगडण्याची तयारी आणि हार न मानण्याची जिद्द ही त्रयी आपल्याला कुठलेही यशशिखर गाठून देऊ शकतात याचे कल्पना ही मूर्तिमंत उदाहरण आहे. जेव्हा जेव्हा कल्पनाचे नाव निघेल तेव्हा प्रत्येका भारतीयांची मान अभिमानाने ताठ होईल, उर भरून येईल आणि तिच्या जीवन प्रवासातून प्रेरणा घेऊन नक्कीच नवीन ‘कल्पना’ तयार होतील.

शिवम पिंपळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)