गंभीर गुन्ह्यांतील शिक्षकांची होणार “शाळा बंद’

पुणे – लैंगिक छळ, अत्याचार यांसह खून, पिस्तूल बाळगणे, खुनाचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यात शिक्षक किंवा प्राध्यापक सापडत असल्यामुळे “शिक्षक’ ही प्रतिमा मलीन होत चालली आहे. जिल्ह्यातील अकरा प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर खून, हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक बाब समोर येते. अशा शिक्षकांची शाळा कायमची बंद केली जाणार आहे.

शाळेतील अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ किंवा मुलांशी अनैसर्गिंक कृत्य केल्याप्रकरणी शिक्षक किंवा त्या शाळेतील कर्मचारी, शिपाई यांच्यावर कारवाई झाल्याच्या अनेक घटना शहरासह जिल्ह्यात उघडकीस आल्या. अशा या विकृत शिक्षकांमुळे “शिक्षक’ या प्रतिमेला डाग लागलेला आहे. दरम्यान, शिक्षकांना जरब बसावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये एखाद्या विद्यार्थीनीने शिक्षकाविरोधात तक्रार केल्यास त्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तीन दिवसांत त्याची चौकशी करावी आणि संबधित चौकशी अहवाल गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवावा. प्राथमिक अहवालात शिक्षक दोशी आढळल्यास तात्काळ संबधित शिक्षकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यात घडत असलेल्या अशा विकृत घटनांमुळे “शिक्षक’ म्हणजे “भक्षक’ बनले, की काय असे म्हणण्याची वेळ आली. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील अकरा शिक्षकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार आणि हत्यार बाळगणे या गुन्हात शिक्षकांना अटक झाल्यामुळे या शिक्षकांना तत्काळ सेवेतून काढण्यात आले आहे.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या शिक्षकांची गय केली जाणार नाही. त्यांना तत्काळ सेवेतून काढण्यात येईल. प्राथमिक शिक्षकांनी “शिक्षक’ या प्रतिमेला डाग लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
– सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)