गंगा स्वच्छतेसाठी उपोषण करणारे संत गोपाल दास बेपत्ता 

देहरादून – स्वच्छ गंगा नदीसाठी आमरण उपोषण करणारे कार्यकर्ता संत गोपाल दास हे काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. देहरादून येथील रुग्णालयातून ते बेपत्ता झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गोपाल दास यांना मंगळवारी दिल्लीमधील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना देहरादून येथील दून रुग्णालयात दाखल केले होते.

रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिक्षक के के टामटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 तारखेला मध्यरात्री एका व्यक्तीने दास यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्या व्यक्तीने आपण दास यांचे सहकारी असल्याचे सांगितले होते. बुधवारी संध्याकाळी मी रुग्णालयातून निघालो होतो.

-Ads-

रात्री 8.30 वाजता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दास बेपत्ता असल्याची माहिती मला दिली. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली, असे त्यांनी सांगितले. डीसीपी विजय कुमार यांनी आम्हाला दास यांच्या वडिलांकडून तक्रार मिळाली असून तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे. डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दास काहीच अन्न घेत नव्हते. त्यांनी ऍलोपॅथिक उपचारालाही नकार दिला होता.देहरादूनचे एसपी प्रदीप राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली नव्हती. आम्ही संबंधित पोलीस ठाण्याला बेपत्ता झाल्याची माहिती दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)