पाचव्या कसोटीसाठी संघ जाहीर 
लंडन: भारताविरुद्ध येत्या शुक्रवारी सुरू होत असलेल्या पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी इंग्लंडने ऑलिव्हर पोप आणि ख्रिस वोक्‍स यांचा पुन्हा एकदा संघात समावेश केला आहे. ओव्हल मैदानावर हा कसोटी सामना रंगणार आहे. दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरलेल्या पोपला ही अखेरची संधी असून मधली फळी बळकट करण्यासाठी वोक्‍सला पाचारण करण्यात आले आहे. सलामीवीर कीटन जेनिंग्जलाही अखेरची संधी देण्यात आली आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार व सलामीवीर ऍलिस्टर कूक पाचव्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होत असल्याने त्याला विजयाने निरोप देण्यासाठी इंग्लंड संघ उत्सुक आहे. ऍलिस्टर कूक इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. दरम्यान जॉनी बेअरस्टो दुखापतीतून सावरला असून स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून पाचव्या कसोटीत खेळण्यासाठी सज्ज झाला असल्यामुळे त्याच्या जागी चौथ्या कसोटीत निवड करण्यात आलेल्या जेम्स व्हिन्सेला मुक्‍त करण्यात आले आहे.
तसेच सरेकडून कौंटी स्पर्धेत खेळणारा ऑलिव्हर पोप गुरुवारी इसेक्‍सविरुद्धचा सामना संपल्यावर इंग्लंड संघात सामील होणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघ- जो रूट (कर्णधार), ऍलिस्टर कूक, कीटन जेनिंग्ज, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, ऑलिव्हर पोप, मोईन अली, अदिल रशीद, सॅम करन, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्‍स व बेन स्टोक्‍स.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)