ख्रिस्त जन्मोत्सव उत्साहात !

  • नाताळ पूर्व संध्येला मध्यरात्रीच्या उपासनेचे आयोजन
  • जन्मोत्सवाचे उल्हासपूर्ण वातावरणात स्वागत

नगर: प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म अखिल मानव जाती साठी झाला असून ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या तत्वानुसार आपले जीवन जगल्यास त्यांना स्वर्गिय राह्य प्राप्त होईल ज्या प्रमाणे परमेश्‍वराने जगावर एव्हढी मोठी प्रिती केली, कि त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठविला त्याचप्रमाणे आपणही एकमेकांवर प्रिती करावी असे प्रतिपादन आजच्या जन्मोत्सव सभेचे मुख्यवक्ते ललित साळवे यांनी केले.

महाराष्ट्रातील जेरुसलेम समजल्या जाणाऱ्या आणि येथील येथील ऐतिहासिक ह्युममेमोरियल चर्चमध्ये आज ख्रिस्त जन्मोस्तवाची उपासना अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडली. आजच्या भक्तीचे संचलन मंडळीचे सहाय्यक आचार्य रेव्ह.विद्यासागर भोसले यांनी केले. तर अध्यक्ष स्थानी रेव्ह. पी.जी.मकासरे हे होते. मुख्य वक्‍ते पुणे येथील धर्मोपदेशक ललित साळवे हे होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आजच्या जन्मोत्सव सभेच्या वेळी सभासद मोठ्या संख्येने चर्च मध्ये उपस्थित होते. विश्‍वस्थांनी सभासदांच्या बसण्याची योग्य व्यवस्था केली होती.सहाय्यक सेक्रेटरी मिलींद भिंगारदिवे यांनी सुचना दिल्या तसेच चर्चचे सेक्रेटरी जॉन्सन शेक्‍सपियर यांनी सर्व सभासदांना चर्चच्या विश्‍वस्त मंडळाच्या वतीने त्याचप्रमाणे अहमदनगर चर्च कौन्सिलच्या वतीने ख्रिस्त जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विश्‍वस्त एन बी जाधव, फ्रॅंकलिन शेक्‍सपियर, सुनिल सोनावणे,
एम.ए. कदम, महेंद्र भोसले, शामराव भिंगारदिवे, विजय अंधारे आदींनी मोलाचे सहकार्य केले. नाताळाच्या पुर्वसंध्येला मध्यरात्रीच्या उपासनेचे आयोजन करण्यात आले होते.

सेंट अन्ना चर्च मध्ये मिडनाईट सर्व्हीस

नाताळाच्या पुर्व संध्येला सेंट अन्ना चर्चमध्ये तसेच तारकपुरच्या सेंट झेव्हीर्यर्स चर्च मध्ये मध्यरात्रीच्या उपासनेचे आयोजनकरण्यात आले होते. सेंट ऍन्ना चर्च मध्ये मध्ये रात्री 10.30 ला सुरू झालेल्या मध्यरात्रीच्या उपासनेची सांगता रात्री 12.30 वाजता केक कापुन करण्यात आली. या उपासनेचे संचालन फादर ऑगस्टीन परेरा यांणी केले तर आज सकाळी 9 वाजता जन्मोत्सवाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. तर सेंट झेव्हीयर्स चर्च मध्ये मध्यरात्रीच्या सभेचे आयोजन रात्री 11.30 ला करण्यात आली ती 1.30 वाजेपर्यंत चालली. त्यानंतर सर्वांना केक व चहा देवून या सभेची सांगता करण्यात आली. या सभेचे संचलन रेव्हरंड वाघमारे यांनी केली.

कालपासूनच केक साठी गर्दी

शहरातील सर्व बेकऱ्यांमधुन नाताळ निमित्त केक तयार करण्याची लगबग सुरू होती, 60 रुपयांपासुन 2000 रुपयांपर्यंतचे केक बेकऱ्यांमधुन उपलब्ध होते. एकमजली ते तीनमजली केक उपलब्ध असल्याने जास्तीत जास्त मजली केक खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये चढाओढ दिसत होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)