ख्रिसमसनिमित्त कॅम्प भागातील वाहतुकीत बदल

पुणे – ख्रिसमस सणानिमित्त कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रोडवर मोठी गर्दी होते. यावेळी सुरळीत वाहतुकीसाठी या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल मंगळवारी (दि.25) सायंकाळी 7 पासून रात्री गर्दी संपेपर्यंत राहणार आहे. यावेळी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असून वाहनचालकांनी याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

गोळीबार मैदान चौकातून एमजीरोड व पुलगेटकडे जाणाऱ्या रोडवरील वाय जंक्‍शनवरून एमजीरोडकडे येणारी वाहतूक ही 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करून ती एसबीआय हाऊस चौकाकडे वळविण्यात येईल.
व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून सदरची वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरागांधी चौकाकडे सोडण्यात येईल.
इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून ती इंदिरा गांधी चौकाकडून लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येईल.
सरतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून ती ताबूत स्ट्रीट रोडमार्गे वळविण्यात येईल.

अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त वाहतूक बदल
चतुर्थीनिमित्त शिवाजी रोडवरील दगडूशेठ गणपती येथे होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.25) सकाळी 9 पासून आवश्‍यकतेनुसार हे बदल राहतील. या कालावधीत पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला असून याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवाजी रोडवरून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बसेस व इतर मोठ्या वाहनांना जाण्यास बंदी करून त्यांनी स्वारगेटकडे जाण्याकरीता स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने डेक्‍कन-टिळक रोड मार्गे स्वारगेटकडे जावे.
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून बाजीराव रोडने सरळ गाडगीळ पुतळा चौकातून इच्छितस्थळी जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)