संग्रहित फोटो

जवळार्जुन- जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वयोगटातील मुले व मुलींसाठी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलींच्या गटात वनपुरी विद्यालयाने प्रथम नंबर मिळविला. तसेच कोथळे विद्यालयाला द्वितीय व जवळार्जुन विद्यालयाला तृतीय नंबर मिळाला. मुलांच्या गटात भैरवनाथ विद्यालय वनपुरी प्रथम क्रमांकावर राहिले. बाबूलाल काकडे विद्यालयाला पिंपरे खुर्द द्वितीय व न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुनला तृतीय नंबर मिळाला.
सरपंच सुनीता टेकवडे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाते. यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍड. महेश राणे, चेअरमन भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे सुधाकर टेकवडे, नगरसेवक अजिंक्‍य सतीश देशमुख, अण्णासाहेब मारुती राणे, दिलीप टेकवडे आदी उपस्थित होते. प्रस्ताविक प्राचार्य उत्तम निगडे यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुनच्या शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)