खो खो स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्यालयाचे यश

आळंदी- जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारीद्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा 2018-19 अंतर्गत तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय आणि खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना आयोजित (खेड) येथे गुरुवारी (दि. 6) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि मॉडर्न हायस्कूल भोसे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा खो खो स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि मॉडर्न हायस्कूल भोसे ( खेड ) येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा खो खो स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील 17 वर्षे वयोगटाखालील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. विजयी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक पी. टी. शिक्षक पवार श्रीरंग आणि राजश्री भुजबळ या शिक्षकांचे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद यादव आणि क्रीडा समितीच्या वतीने कौतुक करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)