खोल समुद्रातील मासळी वधारली

मटण स्थिर, चिकण आणि अंड्याच्या भावात घट
पुणे- पूर्व आणि पश्‍चिम किनारपट्टीवरील स्थानिक बाजारपेठांमध्ये मासळीचे भाव वाढले आहेत. परिणामी गणेश पेठेतील घाऊक समुद्रातील मासळीच्या भावात सुमारे 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. खाडी, नदीच्या मासळीचे भाव मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटणाचे भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. तर मागणीअभावी चिकणच्या भावात किलोमागे 10 रुपयांनी घट झाली आहे. अंड्याचीही मागणी घटली आहे. त्यामुळे गावरान आणि इंग्लिश अंड्याच्या भावात शेकड्यामागे अनुक्रमे 20 ते 45 रूपयांनी घट झाली आहे
रविवारी घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे 12 ते 14 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 300 किलो आणि नदीच्या मासळीची सुमारे 500 किलो इतकी आवक झाली. तर, आंध्र प्रदेश येथून रहु, कतला, सिलनची मिळून सुमारे 14 टन आवक झाली असल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. मासळीचे भाव पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : 1600, मोठे : 1500, मध्यम : 1000, लहान : 750, भिला : 600, हलवा : 520, सुरमई : 520, रावस लहान : 480, मोठा : 650, घोळ : 600, करली : 240, करंदी (सोललेली) : 280, भिंग : 320, पाला : 600-1200, वाम : 340-800, ओले बोंबील : 160. कोळंबी : लहान : 360, मोठी : 480, जंबोप्रॉन्स : 1500, किंगप्रॉन्स : 800, लॉबस्टर : 1500, मोरी : 200-280, मांदेली : 100, राणीमासा : 180, खेकडे : 200, चिंबोऱ्या : 480. खाडीची मासळी : सौंदाळे : 240, खापी : 200, नगली : 320, तांबोशी : 360, पालू : 200, लेपा : 160, शेवटे : 200, बांगडा : 160, पेडवी : 60, बेळुंजी : 140, तिसऱ्या : 160, खुबे : 160, तारली : 140. नदीची मासळी : रहू : 160, कतला : 200, मरळ : 400, शिवडा : 140, चिलापी : 60, मांगूर : 140, खवली : 200, आम्ळी : 80, खेकडे : 160, वाम : 500. मटण : बोकडाचे : 440, बोल्हाईचे : 440, खिमा : 440, कलेजी : 480. चिकन : चिकन : 140, लेगपीस : 170, जिवंत कोंबडी : 110, बोनलेस : 240. अंडी : गावरान : शेकडा : 730, डझन : 102 प्रति नग : 8.5. इंग्लिश : शेकडा : 400 डझन : 60 प्रतिनग : 5.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)