खोरोची ते रेडणी रस्त्याची खड्डे व काटेरी झुडपांनी दुरवस्था

निमसाखर- खोरोची (ता. इंदापूर) या भागातून जाणाऱ्या खोरोची ते रेडणी रस्त्याची खड्डे आणि काटेरी झुडपांनी दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी हा रस्ता जीवघेणा बनल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
खोरोची (ता. इंदापूर) हे गाव नीरा नदी किनारी वसलेल असून, सुमारे तीन हजार लोकसंख्येच आहे. नीरा नदी किनारी असल्याने व पाटबंधारे खात्याकडून शेतीलाही या परिसरातील कॅनॉलच्या माध्यमातून पाणी मिळत असल्याने या परिसरात शेती फळबागा आणि शेती संलग्न व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात. या परिसरातली नागरिक या निरवांगी ते सराटी आणि खोरोची ते रेडणी या रस्त्याचा वापर करून शासकीय अथवा शेती संलग्न आवश्‍यक कामे करण्यासाठी मोठ्या शहराकडे जातात. मात्र, या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी सराटी ते खुर्ची रस्त्याचे काम झाले. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळामध्ये निरवांगीपासून काही अंतर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम दर्जेदार झाले आहे.खोरोची ते रेडणी केवळ पाच किलोमीटरचे अंतर काटेरी झुडपे आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे यांमुळे धोकादायक बनले आहे. खोरोची आणि रेडणी भागातील विद्यार्थ्यांना तर कसरत करतच शाळा-महाविद्यालयातंत जावे लागत असल्याची खंत या भागातील माजी सरपंच संजय चव्हाण, उपसरपंच सतीश हेगडकर, माजी उपसरपंच हनुमंत देवकर, माजी सरपंच सुनील कोकरे, दादासाहेब वाघमोडे, राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस विशाल देवकर, सरचिटणीस, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय फडतरे यांनी व्यक्त केली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)