मुंबई: केरळमधील पुरामुळे तेथून होणाऱ्या मसाल्यांची व खोबरेल तेलाची आवक कमी झाल्यामुळे या वस्तूची टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या वस्तूच्या किमतीवर आता ताण जाणवू लागल्याचे दिसून येत आहे. वेलची 200 तर वेलदोडे 150 रुपये महागले आहेत तर लवंग, काळे मिरी, जायपत्री या मसाल्यांचीही टंचाई निर्माण झाली आहे. केरळमधून होणारी वेलची व वेलदोड्याची आवक थांबली आहे. पुरवठ्यावर परिणाम झाल्याने बाजारात दर वाढू लागले आहेत.

केरळमध्ये लवंग व दालचिनीचे पीकही घेतले जाते. मागील काही वर्षांपासून दालचिनीचा दर्जा घसरल्याने ती विदेशातून मागवली जात आहे. लवंगीची आयातही वाढली आहे. त्यामुळे या दोन मसाल्यांच्या किमतीवर केरळच्या पुराचा परिणाम झालेला नाही. काळ्या मिऱ्यांचीही आयात वाढल्याने त्यांचेही फार दर वाढणार नाहीत, असे व्यापाजयांनी सांगितले. खोबरेल तेलाची केरळमधून केरळमधून होणारी आवक थांबली तरी राज्यात व्यापाऱ्यांकडे साठा आहे. अन्य राज्यांतूनही तेल येत असल्याने किमती स्थिर आहेत. पण केरळातील स्थिती न सुधारल्यास, तेल महागू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)