खोपोडीच्या हद्दीत ऊस वाहतूक ट्रॉल्या उलटल्या

15 बकऱ्याच्या अपघातात मृत्यू ः मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान

यवत/केडगाव- शिरूर-सातारा मार्गावर केडगावजवळील खोपोडी (ता. दौंड) गावच्या हद्दीत ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॉल्या बकऱ्यांच्या कळपावर पडून झालेल्या अपघातात 15 बकऱ्यांचा मृत्यू झाला, तर सहा बकऱ्या जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी (दि. 16) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या घटनेची अधिक माहिती अशी आहे की, मेंढपाळ भिवाजी साळू काळे (रा. चौफुला, बोरीपारधी, ता. दौंड) हे आपल्या बकऱ्या खोपोडी गावच्या हद्दीत राज्य मार्गाच्या कडेला चारीत होते. यावेळी उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या घेऊन ट्रॅक्‍टर चालक सुदाम शिवाजी काळे (रा. पारगाव, ता. दौंड) ट्रॅक्‍टर (क्र. एमएच 42 एफ 2465) घेऊन पारगावकडून केडगावच्या दिशेनी जात होता. ट्रॅकर चालक या बकऱ्याच्या कळपाजवळ आला असता त्याचा ट्रॅक्‍टरवरील ताबा सुटल्याने उसाने भरलेल्या दोन्ही ट्रॉल्या बकऱ्याच्या कळपावर पडल्या. यावेळी या ट्रॉल्यांखाली दबून 15 बकऱ्यांचा मृत्यू झाला, तर सहा बकऱ्या जखमी झाल्या. यामध्ये दोन मेंढपाळ किरकोळ जखमी झाले. मात्र, या घटनेत मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उसाच्या ट्रॉल्या आणि ट्रॉल्यांमधील ऊस रस्त्यावर पडल्याने या मार्गावर दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. ऊस व ट्रॉल्या नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरून हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)