खोदाईप्रकरणी अखेर पोलिसांत तक्रार

खोदाई समोर आल्यानंतरही पालिकेची कारवाई नाहीच

पुणे – महापालिकेकडून शहरात कोणत्याही मोबाइल कंपनीस परवानगी दिलेली नसताना हडपसर रस्त्यावर भैरोबानाला ते क्रोम शोरूमपर्यंत 1 किलोमीटरची रस्ते खोदाई झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी महापालिकेकडून हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

-Ads-

ही खोदाई जलवाहिनी कामासाठी करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ही सर्व जलवाहिनी उद्या (शनिवारी) काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

शहरात विविध मोबाइल कंपन्यांबरोबर महावितरण, एमएनजीएल या कंपन्यांकडून सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदाई केली जाते. त्यासाठी महापालिका शुल्क आकारणी करते. दरवर्षी 1 ऑक्‍टोबरपासून या खोदाईस परवानगी दिली जाते. मात्र, यावर्षी शहर सुधारणा समितीने या उघड्यावर केबल वाहिन्या टाकण्याबाबत धोरण तयार होईपर्यंत रस्ते खोदाईस परवानगी देऊ नये, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेला रस्ते खोदाईच्या परवानगी दिलेल्या नाहीत. त्यात आता केवळ महावितरण आणि एमएनजीएल या कंपन्यांनाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या मोबाइल कंपन्यांकडून पालिकेला खोदाईच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. त्यांना आता जवळपास दीड महिना होत आला असला, तरी अजून परवानगी देण्यास सुरूवात केलेली नाही. असे असतानाच दिवाळी सुट्टीचा फायदा घेत वानवडी भागातील भैरोबानाला ते क्रोमा शोरुमपर्यंत 1 किमी अंतरात अनधिकृतरित्या रस्ते खोदाई करून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही बाब समोर आल्यानंतर पथ विभागाकडून तातडीने या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून ही जलवाहिनी काढून टाकण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)