खोत, लोणकर यांना सहाय्यक आयुक्‍तपदी बढती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी संदीप खोत आणि मनोज लोणकर यांना बढती देण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी महापालिका आस्थापनेवर प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत आहेत. 4 ऑक्‍टोबरला झालेल्या महापालिका पदोन्नती समितीच्या बैठकीत या बढत्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
महापालिका आस्थापनेवर सहाय्यक आयुक्त संवर्गातील एकूण 11 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 11 पदे राज्य शासनाकडून प्रतिनिुक्तीवर भरली जातात. तर उर्वरित पाच पदांवर महापालिका आस्थापनेवरील पात्र अधिकाऱ्यांना संधी दिली जाते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानुसार मागासवर्गीयांना बढत्यांमध्ये पदोन्नती देण्यास मनाई करण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेऊन, न्यायालयाच्या निर्णयांना अधीन राहून, तात्पुरत्या स्वरूपात या दोन्ही अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून तीन वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या अधिकाऱ्यांना महापालिका व नागरिकांशी देणे-घेणे नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना महापालिकेतील कार्यक्षम विभाग सोपविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)