खोडवा उसासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा

भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील यांचे आवाहन

मंचर-राज्यामध्ये उसाखालील क्षेत्रापैकी अंदाजे 40 ते 45 टक्‍के खोडव्याचे क्षेत्र आहे. मात्र खोडव्याची उत्पादकता कमी असल्याने एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा 30 ते 35 टक्‍के इतकाच आहे. खोडवा पिक ठेवून उत्पादन जास्त घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस पीक खोडवा व्यवस्थापन कार्यशाळेत ऍड. प्रदीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अधिकारी पी. व्ही. घोडके, एस. आर. पाटील, आर. जी. यादव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ऊस पीक खोडवा व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. या प्रसंगी भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर, बाळासाहेब थोरात, माऊली गावडे, शांताराम बापु हिंगे, प्रमोद वळसे पाटील, रामदास वळसे पाटील, संदिप हिंगे, सरपंच उर्मिला वळसे पाटील, उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, ऊस विकास अधिकारी संदीप मोरडे, दिनकर आदक, अनिल आगळे, सोमेश्‍वर दीक्षित व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)