खोडद रस्त्यावर दोन दुकाने चोरट्यांनी फोडली

1 लाखांच्या पाण्याच्या मोटार आणि 15 हजार लंपास

नारायणगाव- येथील खडद रस्त्यावरील आशीर्वाद फर्टिलायझर आणि साई अग्रो मशिनरी ही दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील 1 लाख रुपये किमतीच्या पाण्याच्या मोटारी, 15 हजार रुपये रोख रक्कम, कागदपत्रे, सीसीटीव्हीची हार्डडिस्क चोरून नेल्याची घटना शुकयवार (दि. 21) मध्यरात्री घडली.
खडद रस्त्यावरील अमर गांधी व बाळासाहेब शेलोत यांच्या मालकीचे आशीर्वाद फर्टिलायझर या कृषी केंद्राच्या शटरवरील खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्हीची वायर आणि डिव्हाईस तोडून हार्डडिस्क कडून घेतली. त्यानंतर खाली उतरून ड्रॉवर तोडून गल्ल्यातील 10-20 रुपये किमतीच्या नोटा आणि चिल्लर असे 10 हजार रुपये चोरून नेले. चोरट्यांनी शेजारील दुकानाच्या शेडच्या पाइपवरून शटरवरील बारीक कपारी असलेल्या खिडकीतून आत प्रवेश केला, तर दत्तात्रय भागवत बोठे यांच्या मालकीच्या साई अग्रो मशिनरी दुकानातील शेडचा पत्रा उचकटून आत प्रवेश करून चोरट्यांनी सीसीटीव्हीचे वायर व डिव्हाईस तोडून आतील हार्डडिस्क कडून घेतली. दुकानातील 1 लाख रुपये किमतीच्या व्ही 4 मॉडेलच्या पाण्याच्या आठ मोटारी, ड्रॉवरमध्ये ठेवलेले 5 हजार रुपयांची चिल्लर, एटीएम कार्ड, बिले, कागदपत्रे चोरून नेली. हा चोरीचा प्रकार सकाळी साडेआठला दुकान उघडल्यावर निदर्शनास आला. पोलिसांनी घटना स्थळी येऊन पाहणी केली आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)