खोडद -जाधववाडी मार्गाची दुरवस्था

खोडद-जुन्नर व आंबेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या बाबत अतिशय महत्वाचा असणारा खोडद ते जाधववाडी मार्ग थोरांदळे या रस्त्याची अवस्था खड्डे पडून खूप बिकट झाली आहे.
खोडद, जाधववाडी, थोरांदळे परिसरातील शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी या रस्त्याने जाताना व येताना हैराण झाले आहेत. या रस्त्याकडे संबंधित पदधिकारी व अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी व नोकरदार वर्ग तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण संथ गतीने सुरू झाले असून ते सलग व लवकर करावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांनी केली आहे. खंडागळे म्हणाले की, खोडद, जाधववाडी व परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मंचरला व पुण्याला जाण्यासाठी हा रस्ता अतिशय जवळचा आहे. तसेच थोरांदळे, भराडी, खडकी या भागातील शेतकऱ्यांना नारायणगाव येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला शेतमाल घेऊन येण्यासाठी या रस्त्याचा अनेक वेळ वापर करावा लागत आहे. रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे केले नसल्याने रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापासून महानुभव आश्रमापर्यंत वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे; मात्र या रस्त्याच्या कामाकडे पदाधिकारी व अधिकारी लक्ष देत नसल्याने या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून हे काम कधी पूर्ण होणार? हा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)