खोडदमध्ये जीएमआरटी विज्ञान प्रदर्शन सुरू

पहिल्याच दिवशी 16 हजार विज्ञान प्रेमींची भेट

नारायणगाव- जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण जीएमआरटी, खोडद येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शानाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 16 हजार विज्ञान प्रेमींनी भेट दिली, अशी माहिती जीएमआरटीचे प्रशाकीय अधिकारी अ. भी. जोंधळे यांनी दिली.
या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन प्रा. यशवंत गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी वित्त व प्रशासकीय प्रमुख डॉ. जे. के.सोळंकी, डॉ. सदानंद राऊत, प्राचार्य श्रीकांत शेवाळे, खोडदचे सरपंच विश्वास काळे, प्रा. रतिलाल बाबेल, वामन उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये कुतुहल निर्माण होऊन त्यांनी प्रश्न विचारायला हवेत, त्यामुळे भावी काळात संशोधनातून वैज्ञनिक तयार होतील, असे प्रतिपादन प्रा. यशवंत गुप्ता यांनी उद्‌घाटनावेळी केले. याबरोबरच डॉ. सदानंद राऊत यांनी सर्पदंश व उपचार यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रीकांत शेवाळे यांनी आवर्तसारणीबद्दल विशेष माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावर्षी जीएमआरटी विज्ञान प्रदर्शनात 40 शाळा व 50 कॉलेज मिळून 200 प्रकल्प सादर झाले आहेत, तसेच जवळपास 25 शासकीय व निम-शासकीय संशोधन संस्थांनी आपला सहभाग नोंदविला. जीएमआरटी विज्ञान प्रदर्शन उद्या (दि. 1) सुरू असणार असून, संध्याकाळी 4 वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)