खोट्या मतदानासाठी सुरक्षा दलांकडून अपहरण – पाकिस्तानी मतदान अधिकारी

पेशावर (पाकिस्तान) – खोट्या मतदानासाठी सुरक्षा दलांनीच आपले अपहरण केल्याचा दावा एका मतदान अधिकाऱ्याने केला आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर या अधिकाऱ्याची चिठ्ठी अपलोड केली आहे.

बलुचिस्तानातील एका मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. धार्मिक गटबंधन मुत्ताहिदा मजलिस अमलच्या उमेदवाराला जबरदस्तीने बनावट मते देण्यासाठी सुरक्षा दलांनीच आपले अपहरण केल्याचा दावा या मतदान अधिकाऱ्यने केला आहे. वशूक जिल्ह्यातील मतदान केंद्र क्रमांक 45 वर हा अधिकारी काम करत होता.

बलुचिस्तानच्या पीबी-41विधानसभा जागेच्या निवडणूक अधिकाऱ्याने या पत्राचे शिक्‍क्‍यासह सत्यांकन केले आहे. मुत्ताहिदा मजलिस अमलच्या उमेदवाराला 45 बनावट मते टाकल्यास सांगण्यात आले होते. या प्रकरणी गुरुवारी क्वेटा येथे सुनावणी झाली. दोन केंद्रांवरील अधिकाऱ्यांचे अपहरण करण्यात आले होते आणि या दोन्ही मतदान केंद्रांची मते पीबी -41 च्या मतमोजणीत मोजली गेली गेली नाहीत.

मतदान केंद्र क्रमांक 44 आणि 45 चे मते का मोजली गेली नाहीत असा प्रश्‍न बलुचिस्तान अवामी पक्षाचे उमेदवार मीर मुजीबूर रहमान यांनी विचारला होता. त्याच्या उत्तरात हा खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)