खोट्या बातम्या पसरवण्यापेक्षा आपल्या खात्याकडे लक्ष द्या

राहुल गांधी यांची रविशंकर प्रसाद यांना सुचना
नवी दिल्ली – केंद्रीय विधी आणि न्याय खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी खोट्या बातम्या पसरवण्यापेक्षा आपल्या खात्याच्या कारभाराकडे अधिक लक्ष द्यावे अशी सुचना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना केली आहे. ते म्हणाले की त्यांच्याकडे विधी आणि न्याय खात्याचा कारभार आहे आणि आज कोर्टातील प्रलंबीत खटल्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे, न्यायाधिशांच्या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत त्या गेली अनेक वर्षे त्या प्रलंबीत आहेत.

फेसबुकचा डाटा चोरल्याचा आरोप असलेल्या केम्ब्रीज ऍनॅलॅटिका या कंपनीशी कॉंग्रेसचे संबंध असल्याचा आरोप रविशंकर प्रसाद यांनी नुकताच केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी त्यांच्यावर ही टीका केली. केम्ब्रीज ऍनॅलॅटिका या कंपनीशी कॉंग्रेसचे नव्हे तर भाजपचेच संबंध आहेत असा आरोप कॉंग्रेसकडून या आधीच करण्यात आला आहे. आज त्या अनुषंगाने आपल्या ट्‌विटर अकौंटवर राहुल गांधी यांनी म्हटले आहे की आज सर्वोच्च न्यायालयात 55 हजार, उच्च न्यायालयांमध्ये 37 लाख आणि स्थानिक न्यायालयांमध्ये सुमारे 2 कोटी 60 लाख खटले प्रलंबीत आहेत. असे असूनही हाय कोर्टातील न्यायाधिशांच्या चारशे आणि खालच्या न्यायालयातील न्यायाधिंशांच्या 6 हजार जागा रिक्त आहेत. त्या भरण्याकडे त्यांनी कधी लक्ष दिले नाही. पण त्याकडे लक्ष न देता कायदा मंत्री खोट्या बातम्या पसरवण्यात मश्‍गुल आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)