खोट्या बातमीप्रकरणी पोस्टकार्ड न्यूजच्या संपादकाला अटक

बेंगळुरू (कर्नाटक) – खोट्या बातमी प्रकरणी बेंगळुरू पोलीसांनी पोस्टकार्ड न्यूजचे सह संस्थापक आणि संपादक महेश विक्रम हेगडे यांना गुरुवारी अटक केली आहे. पोस्टकार्ड न्यूज ही उजव्या विचारसरणी प्रचारक वेबसाईट आहे. महेश हेगडे यांना आयटी ऍक्‍ट 66 ए आणि आयपीसीच्या 153 ए, 120 आणि 34 खाली अटक केल्याचे सांगण्यात आले असले, तरी 66 ए कलमाची माहिती चुकीचे असल्याचेही सांगण्यात आले आहे.

महेश हेगडे यांनी पोस्टकार्ड डॉट कॉम या वेबसाईटवर जैन मुनींवर मुस्लिमांनी हल्ला करून त्यांना जखमी केल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. जखमी जैन मुनींचा फोटो ट्‌विट करून हेगडे यांनी म्हटले होते, की सिद्धारमैया याच्या कर्नाटकात कोणीही सुरक्षित नाही, मात्र या बातमीचा खोटेपणा लगेचच उघड झाला. संबधित जैन मुनी-उपाध्याय मुनीर सागर मोटरबाईक अपघातात जखमी झाले होते. त्यांच्यावर कोणा मुस्लिमांनी हल्ला केला नव्हता. ट्‌विटवर हेगडे यांचे 7,78,000 फॉलोवर्स आहेत.

दरम्यान महेश हेगडे यांच्या बचावासाठी काही भाजपा नेते पुढे आले आहेत. खासदार प्रताप सिन्हा यांनी ट्‌विट करून हेगडेंचा बचाव केला, तर नंतर कर्नाटकचे भाजपा नेता अनंत कुमार यांनी हेगडेंच्या बचावासाठी ट्‌विट केले आहे. पाठोपाठ भाजपा आमदार आणि कर्नाटक भाजपाचे महासचिव सीटी रवी, भाजपा महिला मोर्चा सदस्य प्रीती गांधी, भाजपा खासदार आणि राष्ट्रीय सचिव महेश गिरी यांनी हेगडे यांच्या समर्थनार्थ ट्‌विट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)