खोटे निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर करणे ही भ्रष्ट कृती

सर्वोच्च न्यायालय: मात्र, संसदेला कायदा करण्याचा आदेश देऊ शकत नाही

नवी दिल्ली – निवडणुकीदरम्यान उमेदवाराने खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणे ही भ्रष्ट कृतीच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज तत्वत: मान्य केले. मात्र, अशाप्रकारची भ्रष्ट कृती करणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यासाठी कायदा करण्याचा आदेश संसदेला देण्यास न्यायालयाने नकार दर्शवला.

पेशाने वकील असणारे भाजप नेते अश्‍विनीकुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगापुढे खोटी माहिती सादर करण्याची कृती निवडणूकविषयक गुन्हा ठरवली जावी यासाठी केंद्र सरकारला आदेश द्यावा, अशी मागणी त्या याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. निवडणूक प्रतिज्ञापत्र गांभीर्याने घ्यावे या भूमिकेशी आम्ही नैतिकदृष्ट्या सहमत आहोत. मात्र, खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणे ही बाब भ्रष्ट कृतींमध्ये सामील करण्याचा आदेश संसदेला देऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सुनावणीच्या प्रारंभी उपाध्याय यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील राणा मुखर्जी यांनी अपात्र ठरवण्याचा मुद्दा उपस्थित केला. खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल शिक्षेत वाढ करून ती दोन वर्षे तुरूंगवास अशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. सध्या सहा महिने तुरूंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)