खोटी माध्यमे हीच मोठी समस्या : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांच्या विरोधात आज पुन्हा एकदा आक्रमक विधाने करीत त्यांना धारेवर धरले आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर फेक न्युज मिडीया या विषयावर जोरदार आक्षेप घेताना काहीं माध्यमे जाणिवपुर्वक खोटेपणा पसरवत असल्याचे म्हटले आहे. आपला राग सर्वच माध्यमांवर नाही तर खोटा प्रचार करणाऱ्या माध्यमांवर आहे असे ते म्हणाले.

त्यांनी या संबंधात सीएनएनचे नाव आर्वजून घेतले आहे. त्यांनी म्हटले आहे की सीएनएन आणि त्यांच्यासारखी माध्यमे फेक न्युज व्यवसायात आहेत ते लोक जाणिवपुर्वक खोटेपणा पसरवत असतात त्यांनीच लोकांपुढे एक मोठी समस्या निर्माण केली आहे. माध्यमे ही लोकांची शत्रु आहेत असे खोटे विधान त्यांनी माझ्या तोंडी घातले आहे. मी असे म्हणालोच नाहीं. सर्वच माध्यमे नव्हे तर खोट्या बातम्या देणारी माध्यमे ही लोकांची शत्रु आहेत असे मला म्हणायचे आहे आणि ते मी म्हणणारच असेही त्यांनी नमूद केले आहे. तुम्ही चुकीची माहिती देता हे चांगले नाही असेही त्यांनी या माध्यमांना बजावले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोक आता माझ्या ट्विटरवरच जास्त विसंबून राहात आहेत. आणि आपल्या 55.5 दशलक्ष समर्थकांनी केवळ माझी ट्विटर विधानेच वाचून माझ्या विषयीच्या वृत्ताची खात्री करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. आपल्या महान देशाचे लोक अशा खोट्या बातम्या वाचून संतप्त आणि नाराज झाले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. तत्पुर्वी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी सारा सॅंडर्स यांनी पत्रकारांना सांगितले की अध्यक्ष सर्वच माध्यमांवर नव्हे तर खोट्या बातम्या देणाऱ्या काही व्यक्तीगत लोकांवर नाराज आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)