खैरेनगर शाळेसाठी तब्बल नऊ लाखांचा निधी जमा

पाबळ – शिरूर तालुक्‍यातील खैरेनगर येथील जिल्हा परिषद शाळेत एकत्र येत माजी विद्यार्थीनी शाळेच्या विकासासाठी तब्बल 8 लाख 85 हजार इतका निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून वर्गखोल्या आणि इतर अनुषंगिक विकासकामे करण्यात येणार असल्याची माहिती माजी सरपंच एकनाथ खैरे यांनी दिली. गुरुवारी (दि.22) गावातील ग्रामदैवत हनुमानाच्या यात्रेनिमित्त व्यवसाय आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले अनेक माजी विद्यार्थी आले होते. यावेळी या सर्वांनी एकत्र येत हा निर्णय जाहीर केला. यावेळी उपस्थितांनी हा निधी जाहीर केला.

या रक्कमेमध्ये 50 माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी आजीवन सभासदत्व स्वीकारत 85 हजार रुपये वार्षिक वर्गणी दिली. या खैरनगरचे सुपूत्र आणि शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.शिवाजी शंकरराव खैरे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ 8 लाख रूपये किंमतीच्या दोन वर्गखोल्या बांधून देण्याचे जाहीर केले. या शाळेसाठी भरीव योगदान देणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आणि डॉक्‍टर यांचे शाळा तसेच खैरेनगर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करून आभार मानण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)