खेळाडू, कामगारांच्या सुविधांसाठी महापालिका विशेष प्रयत्नशील

पिंपरी – महापालिका खेळाडूंसाठी व कामगारांसाठी सोई-सुविधा प्राप्त करुन देण्यासाठी विशेष प्रयत्नशील असल्याची माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.

स्थायी समिती सभागृहात झालेल्या खेळाडू व गुणवंत कामगारांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळी महापौर बोलत होते. स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सह आयुक्त दिलीप गावडे, प्रभारी प्रशासन अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.

महापौर काळजे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून खेळाडूंना फार मोठ्या प्रमाणात सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. चांगल्या प्रकारे नाव कमवलेल्या खेळाडूंना प्राधान्य दिले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे खेळाडूंसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर ही औद्योगिकनगरी असल्यामुळे शहराच्या नावलैकीकामध्ये कामगार श्रमिकांच शहाराच्या भरभराटीसाठी मोठ्या प्रमाणात योगदान लाभले आहे. कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या शहरातील नागरिकांचा उपराष्ट्रपतीकडून सन्मान होणे ही शहर वासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. आपण आपल्या कंपनीपुरते मर्यादित काम न करता पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगिण उन्नतीमध्ये सहभागी व्हावे. या शहराच्या गौरवामध्ये भर पडण्यासाठी कार्य करावे. पंतप्रधान श्रमश्री पुरस्काराने सन्मानीत केल्याने या शहराचे नाव संपूर्ण देशामध्ये होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)