खेळाडूंना पालिकेच्या नोकरीत आरक्षण

पुणे – शहरातील राज्य, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत शहराचा लौकिक वाढविणाऱ्या खेळाडूंना महापालिकेच्या नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षण, खेळाडूंना शिष्यवृत्ती, विमा, क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी आर्थिक मदत अशा प्रकारच्या सवलती महापालिकेकडून दिल्या जाणार आहेत.

पालिकेच्या सुधारित क्रीडा धोरणात सुचविण्यात आल्या असून हे धोरण स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे.

महापालिकेकडून 2013 मध्ये क्रीडा धोरण तयार करण्यात आले आहे. मात्र, या धोरणात काही त्रुटी असल्याने विद्यमान क्रीडा समितीने या धोरणात काही बदल काण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून क्रीडा समितीकडून या धोरणाच्या सुधारीत तरतूदीबाबत चर्चा सुरू होती. त्यानंतर अखेर खेळाडूंसाठी मदतीच्या भरघोस तरतूदी करून हे धोरण मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले आहे.

अशा आहेत सुधारीत धोरणातील तरतूदी
1) राज्यस्तरीय खेळाडूंना पालिका नोकरीत 5 टक्के आरक्षण
2) राज्य वर राष्ट्रीय स्तरावरील खेळांडूंना शिष्यवृत्ती
3) क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी खेळांडूना आर्थिक साह्य
4) साहसी खेळांची तयार करणाऱ्यांना आर्थिक मदत
5) खेळाडूंसाठी शहरात क्रीडा अकादमी
6) खेळाडूंना 1 लाखाचा विमा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)