खेळाडूंचे राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत यश

File Photo

पिंपरी – शिवगंगा रोलर स्केटींगच्या वतीने बेळगाव येथील शिवगंगा आंतरराष्ट्रीय स्केटींग रिंगवर आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत चिंचवड येथील शिवाजी उदय मंडळाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळविले.

रुरल गेम ऑर्गनायजेशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून 500 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत मंडळाच्या 500 व 1000 मीटरमध्ये आदित्य बन्सीवालने रौप्य पदक, 1000, तर 1000 मीटर स्पर्धेत देवेश दंदने कास्य पदक पटकाविले.

-Ads-

याशिवाय शौनक शहा, धन्वेशा क्षीरसागर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. मंडळाचे अध्यक्ष राजाराम गावडे, सचिव सदाशिव गोडसे यांनी अभिनंदन केले. प्रशिक्षक विलास देशपांडे आणि पवन लोहार यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)