खेळांमुळे मुलांचा आत्मविश्‍वास वाढतो – गवारे

चिंबळी- खेळामुळे मानसिक ताण कमी होऊन शरीर सुदृढ व निरोगी राहते, मुलांचा आत्मविश्‍वास वाढतो. तसेच क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण व आनंददायी उपक्रम आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी तो उपयोगी पडेल, असे मत चिंबळी फाटा (ता. खेड) येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल व कॉलजमध्ये संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे यांनी व्यक्‍त केले. श्रीसमर्थ स्कुलच्या वतीने 26 जानेवारीच्या तयारीसाठी सुरू असलेल्या कयावत लेझीम व इतर खेळ तसेच सास्कृंतिक कार्यक्रमास पारंभ केला त्यावेळी गवारे बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी 26 जानेवारी करण्यात येणाऱ्या कवायतींचा कसून सुरवा केला. तसेच यावेळी रंगणाऱ्या विविध स्पर्धांसाठीही खेळाडूंनी मैदानावर घाम गळला. याप्रसंगी त्यांचे मार्गर्शक शिक्षक त्यांना योग्य त्या सूचना देत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)